Saturday, August 24, 2024 01:51:59 PM

राजकुमार रावच्या स्त्री २ चे नवीन पोस्टर आऊट ट्रेलर येणार 2 दिवसात

राजकुमार राव याचा वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपट 'स्त्री 2' च्या रिलीजसाठी तयारी करत आहे आणि चित्रपटाचा ट्रेलर अवघ्या दोन दिवसांत प्रदर्शित होणार असल्याची घोषणा

राजकुमार रावच्या स्त्री २ चे नवीन पोस्टर आऊट ट्रेलर येणार 2 दिवसात 

 

राजकुमार राव याचा वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपट 'स्त्री 2' च्या रिलीजसाठी तयारी करत आहे आणि चित्रपटाचा ट्रेलर अवघ्या दोन दिवसांत प्रदर्शित होणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. अभिनेत्याने चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे अनावरण करून ही खास बातमी प्रेक्षकांना दिली. चित्रपटाच्या टीझरला प्रचंड प्रेम मिळत असताना 18 जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या ट्रेलरमधून चित्रपटाच्या कथानकाबद्दल आणि त्यात राजकुमार रावच्या भूमिकेबद्दल अधिक माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. 

या वर्षाच्या सुरुवातीला राजकुमार रावने बॉक्स ऑफिसवर 'श्रीकांत' आणि 'मिस्टर अँड मिसेस माही' या दोन रिलीझसह वर्चस्व गाजवले आणि 'स्त्री 2' टीझरला मिळालेला जबरदस्त प्रतिसाद बघून आता सगळेच ट्रेलर ची वाट बघत आहेत. सर्वात अष्टपैलू कलाकार हिट्सची हॅट्रिक करण्यासाठी तो सज्ज आहे. 2024 हे त्याचे वर्ष आहे यात शंका नाही. 'श्रीकांत' आणि 'मिस्टर अँड मिसेस माही' यांनी चांगली कामगिरी केल्या नंतर 'स्त्री 2' ची सगळ्यांना उत्सुकता आहे.

'स्त्री 2' हा 15 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार असून 'स्त्री 2' व्यतिरिक्त, राजकुमार राव 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' मध्ये दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/C9eTs-kI0A1/?igsh=bjAwd3kzbDVjb2tz


सम्बन्धित सामग्री